मंत्रालयातील संगणक प्रणालीत बुधवारी व्हायरस शिरल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मंत्रालयातील सर्व कॉम्प्युटर्स या व्हायरसचे बळी ठरले नसले तरी अनेक कॉम्प्युटर्समध्ये व्हायरस शिरल्याची माहिती मिळत आहे. हा व्हायरस नेमका कुठून आला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या मंत्रालयातील आयटी विभागाकडून संगणक प्रणालीतून हा व्हायरस दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी माहिती या संगणकांमध्ये आहे. व्हायरसमुळे ही माहिती करप्ट झाल्यास ती कायमची गमावावी लागू शकते. मंत्रालय प्रशासनाकडून आत्तपार्यंत यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
‘लॉकी रॅन्सन’ नावाच्या या व्हायरसमुळे अनेक संगणक करप्ट झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही मंत्रालयातील अनेक कॉम्प्युटर बंद असून, तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक संगणक करप्ट झाले आहेत. ई-मेल द्वारे हा व्हायरस मंत्रालयापर्यंत पोहोचला. या व्हायरसमुळे मंत्रालयातून मेल करणे अशक्य झाले आहे. केवळ जेपीजी फाईलच ओपन होत आहेत.त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना g mail वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, ऑफिशियल मेल वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पोर्टेबल उपकरणांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा