माणसाने दिलेल्या तोंडी सूचनांवर चालणाऱ्या संगणकांबाबतचे संशोधन परदेशात प्राथमिक स्तरावर आहे. परदेशातील आणि भारतातील इंग्रजीची उच्चारशैली (अॅसेंट) यात बरीच तफावत असल्याने अशा संशोधनांना भारतात यश मिळत नव्हते. मात्र, हीच किमया नवी मुंबईतील संगणक शास्त्रामध्ये नुकतीच पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या स्वप्निल बाळासाहेब देसाई या २४ वर्षीय विद्यार्थ्यांने करून दाखवली आहे. स्वप्निलने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या साह्याने अतिशय सोप्या आणि भारतीय शैलीतील इंग्रजी उच्चारांनुसार संगणकाला हाताळता येऊ शकते, गेले दहा महिने रात्रंदिवस एक करून स्वप्निलने एकहाती विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरबाबत तीन कंपन्यांनी बोलणी चालवली आहेत.
वाशी येथे राहणाऱ्या स्वप्निलने विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरचे नाव ‘आर्टक्यिुलेटिंग कमांडिंग सॉफ्टवेअर’ असे आहे. पनवेलमधील पिल्लई कॉलेजमधून संगणक शास्त्र शाखेतून पदवी मिळवल्यानंतर स्वप्निलने पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून याच वर्षी एमएस्सी पूर्ण केले. त्याच्या काही महिने आधीपासूनच त्याने या सॉफ्टवेअरवर काम सुरू केले होते. ‘तुम्ही बोला, कम्प्युटर ऐकेल’ अशा अतिशय साध्या सूत्रावर स्वप्निलचे हे संशोधन आधारित आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर मायक्रोफोन असलेल्या हेडफोनच्या साह्याने संगणक हाताळता येतो.
आतापर्यंत अशी अनेक सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्रॅम परदेशात विकसित झाले असले तरी ते सर्व परदेशी इंग्रजी उच्चारशैलीनुसारच काम करत होते. मात्र स्वप्निलचे हे सॉफ्टवेअर भारतीय उच्चारशैलीतील इंग्रजी सूचनांनुसार काम करते. यासाठी लागणारा खर्च कमी आहेच; शिवाय हे कोणत्याही प्रकारच्या (िवडोज, मॅक, लिनक्स, अँड्रॉइड) ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. स्वप्निलला या सॉफ्टवेअरमध्ये आणखी सुधारणा करायच्या आहेत. मात्र, यासाठी त्याला आíथक निधी आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भात त्याने दोन-तीन कंपन्यांशी बोलणीही केली आहेत.
यूटय़ुबवर हजार हिट्स
स्वप्निलने हे सॉफ्टवेअर विकसित केल्यानंतर ते कसे काम करते, हे दाखवणारा व्हिडीओ यूटय़ुबवर प्रसारित केला. त्यानंतर महिन्याभरात या व्हिडीओला एक हजारहून अधिक हिट्स मिळाली आहेत.
अजी सुनते हो?..
स्वप्निलने आता भारतीय भाषांत दिलेल्या आज्ञांवर संगणक चालवणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. यासाठी त्याचा भर िहदी भाषेतून दिलेल्या आज्ञांवर आधारित सॉफ्टवेअर बनवण्यावर आहे.
तिळा तिळा दार उघड..
या सॉफ्टवेअरमुळे संगणकासमोर ‘ओपन फाइल’ असे म्हणताच फाइल ओपन होते. किंवा ‘ओपन ब्राउजर’ म्हणताच इंटरनेट ब्राउजर ओपन होतो. िहदीत सॉफ्टवेअर बनवण्यासाठी स्वप्निला लाखो शब्द जमवावे लागतील व त्यांची जावाच्या प्रोग्रॅिमग लँग्वेजनुसार नोंद करून मग सॉफ्टवेअर विकसित करावे लागेल.
असे आहे सॉफ्टवेअर
‘जावा’ या कम्प्युटर प्रोग्रॅिमग लँग्वेजमध्ये हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. याच्या मदतीने फाइल ओपन करण्यापासून ते इंटरनेटवर सर्च करण्यापर्यंतच्या सर्व तोंडी सूचना तसेच शब्द टाइप करण्याच्या आज्ञावली संगणक पाळतो. स्वप्निलने दीड लाख आज्ञावलींची या प्रोग्रॅममध्ये नोंद केली आहे. मात्र, प्रत्येक व्यक्ती वा कंपनीला आवश्यक आज्ञावलींची भर टाकून सॉफ्टवेअर विकसित करण्याचीही त्याची तयारी आहे.
बोले तसा चाले त्यासी संगणक म्हणावे!
‘तुम्ही बोला, कम्प्युटर ऐकेल’ अशा अतिशय साध्या सूत्रावर स्वप्निलचे हे संशोधन आधारित आहे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर मायक्रोफोन
First published on: 10-11-2013 at 03:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer works on oral commands