मुंबई : पश्चिम उपनगरातून जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या मार्गाचे कॉंक्रीटीकरण करणे अशक्य असून त्याचे मार्गाचे केवळ पुनपृष्टीकरण केले जाणार आहे. हा मार्ग एमएसआरडीसीने काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी दुर्दशा झालेली असली तरी या मार्गाचे कॉंक्रीटीकरण करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते असून सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या व्यतिरिक्त पूर्व आणि पश्चिम दृतगती मार्ग हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगरपालिकेकडे नोव्हेंबर २०२२ मध्ये हस्तांतरित केले होते. हे दोन्ही महामार्ग नेहमीचे वर्दळीचे मार्ग आहेत. रोज मुंबईत ये जा करणाऱ्या वाहनांसाठी हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे आहेत.

thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात…
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक असणार
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द
ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
पहाडी गोरेगावमधील ३५ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण; मार्च अखेरपर्यंत निवासी दाखला मिळवण्याचे म्हाडाचे नियोजन

या दोन मार्गांपैकी पूर्व दृतगती मार्गाची अवस्था बरी आहे. मात्र पश्चिम दृतगती मार्गाच्या सपाटीकरणाची गरज आहे. या मार्गाची नुकतीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाहणी केली. त्यावेळी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभाग हद्दीत पदपथ, रस्ते दुभाजक, कडठे यांची रचना भिन्न स्वरूपाची आहे. त्यात एकसमानपणा यायला हवा. त्यासाठी रस्ते विभागाने धोरण तयार करावे. त्याची अंमलबजावणी विभाग कार्यालयांनी करावी, अशी सूचना गगराणी यांनी दिली.

वांद्रे त दहिसर पर्यंत असलेला पश्चिम दृतगती मार्ग हा तब्बल २५ किमीचा असून तो मुंबई महापालिकेच्या तब्बल नऊ विभागांमधून जातो. या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी आता मुंबई महापालिकेकडे आहे. या मार्गाच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. मात्र या मार्गावरून दररोज इतक्या संख्येने वाहने ये जा करीत असतात की या मार्गाचे कॉंक्रीटीकरण करणे शक्य नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कॉंक्रीटीकरण हे थोड्या थोड्या भागाचे केले जाते. तेवढा भाग किमान २० ते ३० दिवस बंद ठेवावा लागतो. पश्चिम दृतगती मार्ग बंद ठेवणे अशक्य असल्यामुळे या मार्गावर एकतर मायक्रोसरफेसिंग किंवा डांबरीकरण करणे हेच पर्याय असल्याचे पालिका अधिकाऱयांनी सांगितले.

Story img Loader