केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरवर्षी हे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर होते. मात्र, यंदा अभ्यासक्रम बदलणार असल्याने पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकले नसल्याचे समजते. येत्या आठवडाभरात हे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले जाण्याची शक्यता आहे. राज्यातून यूपीएससीच्या परीक्षेसाठी सुमारे एक लाख विद्यार्थी बसत असतात. दरवर्षी पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर होते. मात्र, यंदा हे वेळापत्रक २ फेब्रुवारीला जाहीर होणार होते. परंतु यूपीएससीच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बदलणार आहे. अभ्यासक्रम बदलण्याचे हे काम वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकले नसल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा