जगातील विविध देशांनी आजपर्यंत मंगळावर ५१ मोहिमा आखल्या असून, त्यातील केवळ २१ यशस्वी झाल्या आहेत. मात्र, भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरल्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. ही मोहीम आखणा-या आणि यशस्वी करणा-या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) पाठीवर जगभरातून कौतुकाची थाप पडत आहे. अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेनेही ‘इस्त्रो’चे अभिनंदन केले आहे. हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः इस्रोच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होते. यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर मोदी यांनी टाळ्या वाजवून सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय शास्त्रज्ञांना तुम्हीसुध्दा शुभेच्छा देऊ शकता. आपल्या शुभेच्छा खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा.
आणखी वाचा