मुंबई : मुंबईवरील अतिरेक्यांचा हल्ला व इतर खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांनी बरीच कमाई केली, विशेष म्हणजे मुंबईत शासकीय कोट्यातून सदनिका प्राप्त करूनही त्यांनी हॉटेलमधील निवास भाडेही वसूल केले, त्यांना काँग्रेसवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्रात आश्वासनांचा म हापूर

भाजपचे उमेदवार म्हणून अॅड उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील खटल्यात ते सरकारी वकील होते. या हल्ल्याचा तपास व अतिरेकी कसाबला झालेली फाशी हे सगळे काँग्रेसच्या काळात झाले. मात्र अॅड. निकम त्याचे श्रेय आता भाजपला देऊन त्यावर प्रचार करीत आहेत़ राज्य सरकारने निकम यांना वर्सोवा येथे म्हाडाच्या स्वेच्छाधिकार कोटयातून घर दिले होते, तरीही त्यांनी २०११ ते २०१७ या कालावधीत मुंबईत निवासापोटी सुमारे १७ लाख रुपये उकळल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress allegation on ujjwal nikam of embezzling money for hotel accommodation zws