महापालिकेतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेविकांमध्ये झालेल्या मारहाणीचे प्रकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर व यामिनी जाधव यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे . रेसकोर्स येथील भूखंड ताब्यात घेण्याच्या ठरावाच्या सूचनेवरून २५ जून रोजी महापालिकेत कॉंग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे केली होती. तर विरोधी पक्षाने शिवसेनेच्या दोन नगरसेविकांना एक दिवसासाठी निलंबित करण्याची मागणी महापौरांकडे केली होती. या प्रकरणी शिवसेना आणि कॉंग्रेसकडून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.आता विरोधी पक्षनेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे दाद मागितली असल्याने या बाबत ते काय निर्णय घेतात, त्याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा