‘पेगॅसस’च्या मुद्य्यावरून आज मुंबईत काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. काँग्रेसने आज या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेत भाजपाच्या दादरमधील कार्यालयसमोर आंदोलन सुरू केलं. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला.

यानंतर भाजपा नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे नेते झिशान सिद्धिकी हे कार्यकर्त्यांसाह रस्त्यावर आमनेसामने आले आहेत. दादर पूर्व परिसरात हा गोंधळ सुरू झाला आहे. पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

एकीकीडे आंदोलनासाठी काँग्रेस कार्यकर्ते आल्याचे पाहून दुसऱ्या बाजुला भाजपाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवारण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागत आहे. झिशान सिद्धिकी हे वांद्रे पूर्व मधील काँग्रेसचे आमदार आहेत. कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांनाही धक्काबुक्की होताना दिसत आहे.

Story img Loader