कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यपदाचे राजीनामे बुधवारी प्रदेश पक्षाध्यक्षांकडे दिला आहे. काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे या नगरसेवकांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. मात्र त्यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिलेले नाहीत.  नवीन सिंग, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हृदयनाथ म्हात्रे, सदाशीव शेलार, शिल्पा शेलार या नगरसेवकांचा राजीनामा देणाऱ्यामध्ये समावेश आहे.  डोंबिवली पूर्व काँग्रेस अध्यक्ष गंगाराम शेलार यांचाही या राजीनामापत्रात समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress corporters in dombivli giving resignation