विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या स्क्रिनिंग समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसकडून विधानसभेच्या २८८ जागांवरील उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
या बैठकीनंतर १७४ जागांवरील उमेदवारांची यादी अंतिम निश्चितीसाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचेही माणिकराव ठाकरे म्हणाले. तसेच उर्वरित ११४ जागांबाबतही लवकरच हायकमांड निर्णय घेतील असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीला बदलून हव्या असलेल्या जागांबाबतही विचारविमर्श करण्यात आल्याचे माणिकराव म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी जास्तीच्या जागांच्या मागणीच्या दबावाला काँग्रेस बळी पडणार नाही असे संकेतच काँग्रेसने यातून दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे भिजते घोंगडे अजूनही कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा