मुंबई : बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी महिन्याच्या सुरूवातीला अटक करण्यात आलेला काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश (४२) याला उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. तसेच, त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेला आव्हान दिले आहे. तसेच, अटक बेकायदा ठरवून त्याला सुनावण्यात आलेली पोलीस व न्यायालयीन कोठडी रद्द करावी. त्याचप्रमाणे, त्याची अंतरिम जामिनावर तातडीने सुटका करावी, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने प्रकरणातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर गणेश याची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी, प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश देताना या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११० नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. हे प्रकरण स्पष्टपणे बेदरकारपणे गाडी चालवण्याचे आहे. परंतु, याचिकाकर्ता हा मद्यपान करून गाडी चालवत नव्हता. तरीही, या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे असे असेल तर अपघातांच्या सगळ्याच प्रकरणात हे कलम लावावे लागेल, अशी टिप्पणी करताना पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही न्यायालयाने सुनावले.

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Despite the Pedestrian Safety Policy non implementation forces pedestrians to walk on roads
पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

हेही वाचा : अणुशक्ती नगरमध्ये नव्या उमेदवाराला संधी ? विद्यमान आणि माजी आमदार अन्यत्र नशीब आजमावण्याच्या तयारीत

तत्पूर्वी, गणेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्याच्यावर केवळ जामीनपात्र आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११० नुसार सदोष मनुष्यवधाचा अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आला हे गणेश याच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याशिवाय, गणेश याला काही गंभीर आजार असल्याने त्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात आली. गणेश याच्यावर सुरूवातीला जामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिसांनी त्याला अटकेपूर्वी चौकशीला बोलवणे गरजेचे होते. परंतु, पोलिसांनी त्याला ही नोटीसही बजावली नाही, असेही त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

हेही वाचा : एफडीएची दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम

दरम्यान, सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात गणेश याला जामीन देण्यास नकार दिला होता. पुराव्यांचा विचार करता गणेश याने दुचाकीला धडक दिल्यानंतर तेथून पळ काढला. त्याने वाहनाने जखमीला काही अंतरापर्यंत फरफरट नेले, असे सत्र न्यायालयाने गणेश याला जामीन नाकारताना नमूद केले होते. मधुमेही असल्याने आपल्याला दृष्टीदोष आहे. त्यातूनच हा अपघात झाल्याचा गणेश याचा दावाही सत्र न्यायालयाने फेटाळला होता. आरोपी आणि जखमी एकाच परिसरात राहतात. शिवाय, प्रत्यक्षदर्शींचे जबाब अद्याप नोंदवायचे आहेत. अशा टप्प्यावर आरोपीला जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असे नमूद करून सत्र न्यायालयाने गणेश याचा जामीन फेटाळला होता. सत्र न्यायालयाच्या निर्णयविरोधात गणेश याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयाजवळ ५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळी गणेश याच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात, दुचाकीस्वार जखमी झाला होता.

Story img Loader