पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यानं थेट मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे. विरोधी पक्षांनी यावरून शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. एकीकडे सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रांगा लावाव्या लागत असताना दुसरीकडे अशा गुंडांना थेट मुख्यमंत्री भेटतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर पोस्ट केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

संजय राऊतांच्या पोस्टनंतर चर्चेला सुरुवात

मंगळवारी सकाळी संजय राऊतांनी केलेल्या पोस्टवरून चर्चेला सुरुवात झाली. “महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शाह यांच्या राज्यकर्त्या टोळीने?” असा प्रश्न करत संजय राऊतांनी निलेश घायवळचा मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर केला होता.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान

विजय वडेट्टीवार यांची खोचक पोस्ट!

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर केलेल्या पोस्टमध्ये या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे”, असं विजय वडेट्टीवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. यासोबत त्यांनी संबंधितांनी मंत्रालय परिसरात तयार केलेलं एक रीलही पोस्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणारा निलेश घायवळ कोण?

“महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती ‘मोदी की गॅरंटी’?” असा खोचक सवालही त्यांनी केला.

पत्रकार परिदेत मुद्द्यावर सविस्तर भाष्य

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं. “निलेश घायवाळ हा जामिनावर बाहेर आहे. जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयात रील तयार करतो आणि बाकीचे लोक रांगेत मरतात. बाकीच्या लोकांना रांगेत उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे. गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारं हे सरकार आहे. हा कशी एवढी हिंमत करतो? गंभीर गुन्हे असणारा जामिनावरील व्यक्ती मुख्यमंत्र्यांना सहाव्या माळ्यावर जाऊन भेटतोय”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

“आम्हाला हे माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कष्टातून मोठे झाले. पण पक्ष फोडल्यानंतर एवढं पाशवी संख्याबळ त्यांच्या पाठिशी असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना भेटण्याची का गरज पडत आहे? याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावा. पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची लाज घालवली. आता उरली-सुरली गुंडांना प्रवेश देऊन घालवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.