अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांची मुलगी सिद्धी परदेशात जाऊन वैमानिक झाल्याबद्दल एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी वैमानिक झाल्याचं कौतुक करताना ती कोणतीही सवलत,आरक्षण नसताना स्वतःच्या जोरावर वैमानिक झाल्याचं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका होत आहे. आता काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी पोंक्षेंच्या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

युवराज मोहिते म्हणाले, “अभिनेते शरद पोंक्षेंनी त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे पायलट झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. सावित्रीची एक लेक पायलट झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र ही माहिती देताना नेहमीप्रमाणे शरद पोंक्षेंनी विकृत जातीय टिप्पणी केली. ते आरक्षणाशिवाय लेक पायलट झाली असं म्हणत आहेत.”

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

“या विकृत माणसाने काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे”

“या विकृत माणसाने काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. अमोल यादव हा तरूण जेट एअरवेजमध्ये डेप्युटी चीफ कॅप्टन आहे. त्याने थेट विमान बनवण्याचा एक ध्यास घेतला होता. आंबेडकरी चळवळीतील त्याचे वडील प्राध्यापक एस. एस. यादव यांनी कर्ज काढून त्याला पैसे दिले. अमोलने जुगाड करत कांदिवलीतील इमारतीच्या गच्चीवर विमानाची जुळणी सुरू केली,” अशी माहिती युवराज मोहितेंनी दिली.

“गेली ९ वर्ष अमोल जमिनीसाठी चकरा मारतोय”

“अनंत अडचणींवर मात करत त्याने विमानही बनवलं. भारतीय बनावटीचं ते पहिलं विमान ठरलं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी या विमानाबरोबर मिरवत मेक इन इंडियाचा बोलबोला केला. अमोलला या उद्योगासाठी जमीन देऊ केली. गेली ९ वर्ष अमोल या जमिनीसाठी चकरा मारतोय,” असा आरोप युवराज मोहिते यांनी केला.

“प्रतिकने अनेकांना नम्र नकार दिला”

दुसरं एक उदाहरण सांगत युवराज मोहिते म्हणाले, “गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील एका कुटुंबातील प्रतिक सुखदेव ऐवळे अप्रतिम सेवा बजावत स्वकर्तृत्वावर एअर इंडियामध्ये मुख्य पायलट झाला. ज्यावेळी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा तिथे असंख्य भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. मुलांचे हाल झाले. बोंबाबोंब झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणायची मोहीम सुरू झाली. हे जोखमीचं काम होतं. प्रतिक या कामगिरीवर तैनात झाला. न थकता त्याने ये-जा केली. कमी कालावधीत मुलांना सुखरूप भारतात आणलं. या कामगिरीबाबत अनेकांना त्याचा सत्कार करायचा होता. मात्र, प्रतिकने नम्र नकार दिला.”

“हजारो वर्षे पोंक्षे प्रभुतींना सर्वच क्षेत्रात निर्विवाद आरक्षण होतं”

“अमोल, प्रतिक हे प्रातिनिधिक आहेत. आरक्षणातून संधी मिळाल्यानंतर ही मुलं काय करू शकतात याचं हे उदाहरण आहेत. हजारो वर्षे पोंक्षे प्रभुतींना सर्वच क्षेत्रात निर्विवाद आरक्षण होतं. आता कुठे पिचलेल्या समाजातील मुलं संविधानाचं बोट पकडून गगनाला गवसणी घालू शकत आहेत. ही पोंक्षेंची पोटदुखी म्हणावी का?”, असा प्रश्न युवराज मोहितेंनी विचारला.

हेही वाचा : शरद पोंक्षेंची मुलगी झाली वैमानिक; म्हणाले, “कोणतीही सवलत,आरक्षण नसताना…”

“शरद पोंक्षे आपल्याला दिर्घायुष्य लाभो. मात्र विकृत विचारांच्या कॅन्सरवर संविधानाची केमो घ्यावी एवढीच अपेक्षा आहे. लवकर बरे व्हा,” असं म्हणत युवराज मोहितेंनी शरद पोंक्षेंना टोला लगावला.

शरद पोंक्षे काय म्हणाले होते?

“सिद्धी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परिस्थितीतून, माझं आजारपण, करोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत, कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुद्धिमत्ता, परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान, अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिद्धी. मोठी हो, पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे, करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा”, असे शरद पोंक्षेंनी म्हटले आहे.