मुंबई : सांगलीत माघार घ्यायची की मैत्रीपूर्ण लढत करायची याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व घेणार आहे. यामुळेच राज्यातील नेत्यांना आता केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.  सांगलीची जागा लढण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आघाडीत निर्णय होण्यापूर्वी परस्पर उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते संतापले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 सांगलीची जागा पक्षाने सोडू नये यासाठी आमदार विश्वजित कदम व पक्षाचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. कदम यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकीर्जुन खरगे आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस वेणूगोपाळ यांची भेट घेतली आहे.  शिवसेनेने सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली असून, काँग्रेसनेही या जागेवर आपला हक्क कायम ठेवला आहे. १९६२ ते २०१४ पर्यंत सातत्याने काँग्रेस पक्षाने ही जागा जिंकली आहे. याशिवाय जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. याउलट शिवसेनेची ताकद नगण्य असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leaders are waiting for delhi decision regarding the sangli seat election amy