दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या मतदार संघातील काँग्रेसचे पारंपारीक उमेदवार आमदार विलासकाका पाटील उंडाळकर बंड करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे उंडाळकर यांनी रविवारी मुंबई येथे जाहीर केले. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोडण्यासाठी विद्यमान काँग्रेस आमदार विलासकाका पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला असून, या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार यावर ते ठाम आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच उंडाळकरांचा बंडाचा पवित्रा
दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या मतदार संघातील काँग्रेसचे पारंपारीक उमेदवार आमदार विलासकाका पाटील उंडाळकर बंड करण्याच्या तयारीत आहेत.
First published on: 14-09-2014 at 09:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress man to contest election against cm chavan