राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं असून स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती असं स्पष्ट मत मांडलं आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे अशा शब्दांत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

इम्रान प्रतापगढी यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून यावेळी नाना पटोले तसंच इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

काँग्रेसने प्रमुख नेत्यांची सोय केली, संजय राऊतांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले “स्थानिक उमेदवार दिला असता तर…”

“काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे. केंद्रातील कमकुवत सरकारने आठ वर्षात देशाची वाट लावली असून त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे त्यातील ही एक मानसिकता आहे. आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिला”, असं सांगत नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे आभार मानले.

“सोनिया गांधींनी स्वतः २००४ मध्ये आश्वासन दिलं. मात्र, १८ वर्षे होऊनही…”; काँग्रेस नेत्या नगमा यांचा संताप

“निवडणुकीला काही जास्त दिवस राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दिवसाही स्वप्नं पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे. या निवडणुकीत मतदान उघडपणे होते त्यामुळे ते दावा करत असलेली मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे,” असं आव्हान नाना पटोले यांनी यावेळी दिलं. “राज्यसभेच्या निवडणुका विनविरोध होतात, पण विरोधकांचा काही दावा असेल तर त्यावर काही बोलायचं नाही,” असं नाना पटोलेंनी सांगितलं.

नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “मी श्रेष्ठ आहे असं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडलं असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे”.

भाजपाने कोल्हापुरात उमेदवार उतरवल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “घोडेबाजार करण्यासाठी संभाजीराजेंची…”

“भाजपात उमेदवारी दिलेले आहेत आणि तिथेही कुरघोडी आहे. पण तिथे लोकशाही नाही, मत मांडण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे मांडलं असेल कारण त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. हा पक्षीय स्तरावरील प्रश्न नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीत काँग्रेसची बैठक होण्यासंबंधी आणि नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. हे सरकार झालं, त्याचं कारण सर्वांना माहिती आहे. सोनिया गांधींनी तेव्हा किमान समान कार्यक्रमाची भूमिका मांडली होती. त्याचा आढावा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. भूमिका पूर्ण झाली का हे तपासणार आहे. सरकारने त्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा आहे”.

Story img Loader