विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानापुढे करण्यात येणारं आंदोलन काँग्रेसने स्थगित केलं आहे. सोमवारी सकाळी आंदोलन करण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर भाजपानेही हिंमत असेल तर येऊन दाखवा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असं आव्हान दिलं होतं. दरम्यान आंदोलनासाठी निघालेल्या नाना पटोले यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी माफी मागेपर्यंत भाजपा नेते, आमदार, खासदारांच्या घरापुढे, भाजप कार्यालयांपुढे आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. भाजपा कार्यालयांपुढे निदर्शने झाल्यावर सोमवारी फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे आंदोलन केलं जाणार होतं. दरम्यान या आंदोलानमुळे भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांना काही ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या…
247 best buses accidents reported in 3 years
तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
12 colleges in state offering acupuncture treatment for first time
राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
mumbai 155 police inspectors transferred before assembly elections have returned
पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त

नाना पटोले आंदोलनासाठी निघाले असताना पोलिसांनी अडवल्यावर त्यांनी पायी जाण्याची तयारी दर्शवली होती. यावेळी पोलिसांनी त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल सांगत आंदोलन न करण्याची विनंती केली. यानंतर नाना पटोले यांनी तिथे उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला संदेश द्यायचा असून आम्ही इथेही आंदोलन करु शकतो. काँग्रेसच्या हाकेला आज सर्वांनी साथ दिला आहे. महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. आम्ही पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं पहिल्यापासून सांगत आहोत. आमची अहिंसेची भूमिका आहे”.

“महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांचा, विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले. आंदोलनाची पुढील तारीख आम्ही सांगू असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही”.

“भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलं नसून लोकांची गैरसोय म्हणून ते तात्पुरतं स्थगित केलं आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

Story img Loader