विधान परिषदेच्या स्थानिक संस्था प्राधिकरणाच्या आठ जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणी कोणत्या जागा लढवायच्या यावर एकमत होऊ शकले नाही.
राष्ट्रवादीने नगर, सोलापूर, बुलढाणा या जागा गेल्या वेळी राष्ट्रवादीने लढविल्या होत्या. या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी नगर आणि बुलढाणा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने या जागा सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील या नेत्यांच्या उपस्थितीत आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. सत्तेत असताना राष्ट्रवादी दबावाचे राजकारण करून मनाप्रमाणे पदरात पाडून घेत असे. आताही हाच कल कायम राहतो का हे लक्षणिय ठरणार आहे.

Story img Loader