काँग्रेस-राष्ट्रवादीत परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागलेली असते, पण काही वेळा समानताही आढळते. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीचे प्रवक्ते मदन बाफना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर त्याच वेळी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पक्षात डावलले जात असल्याची भावना व्यक्त करीत पक्षाची भूमिका मांडण्याचे टाळले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नावे दोनच आठवडय़ांपूर्वी जाहीर करण्यात आली तेव्हा मदन बाफना यांची प्रवक्तेपदी फेरनियुक्ती करण्यात आली होती. पण प्रदेशमधील काही नेतेमंडळींच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून बाफना यांनी पदाचा राजीनामा सादर केला. बाफना यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी केली. राज्यसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचे आश्वासन देऊनही वारंवार डावलले जात असल्याने काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहा वर्षे प्रवक्तेपद भूषवूनही आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा