महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता; संजय राऊत यांचा दावा काँग्रेसने फेटाळला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाने अडचणीत आलेल्या शिवसेनेने या मुद्दय़ावर महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा देताच काँग्रेस आणि शिवसेनेची मते वेगळी असली तरी महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्वाळा काँग्रेसने दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे भाजप व शिंदे गटाने शिवसेनेला घेरले आहे. हा वाद पक्षाला महागात पडू नये म्हणूनच सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मान्य नाही तसेच यातून महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला. राऊत यांच्या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
काँग्रेसने मात्र शक्यता फेटाळून लावली. सावरकर यांच्यावरून शिवसेना व काँग्रेसची मते भिन्न आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. पण त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, असा निर्वाळा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते खासदार जयराम रमेश यांनी दिला. राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झालेल्या रमेश यांनी संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या वेळी रमेश यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
राणेंची टीका
स्वा. सावरकर यांच्या गौरवशाली इतिहासाची माहितीच नाही. ते या विषयावर काय बोलणार आणि सावरकरांवरील राहुल गांधींच्या टीकेवरून ते कसला निषेध करणार. त्यांना या टीकेचे गांभीर्यच कळले नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी डोंबिवलीत आदित्य ठाकरेंवर केली.