मुंबई : केंद्रातील भाजप सरकारमुळे धोक्यात आलेली लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे. जे पक्ष भाजपच्या विरोधात लढण्यासाठी पुढे येतील, त्यांना बरोबर घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली. सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शहरांची नावे बदलून बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल पटोले यांनी केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघात कामे होऊ दिली जात नाहीत. सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यास कारवाई केली जाते असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.