पालघर तालुक्यातील वेळगाव येथे घरगुती गॅस सिलिंडर भरण्याचा प्रकल्प पूर्ण न होण्यात माझ्यानंतर आलेले पेट्रोलियम खात्याचे काँग्रेसचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी केला.‘केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांचा मतदारसंघांवर ठसा’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीत ‘राम नाईक यांच्या मतदारसंघातील प्रकल्प भूमिपूजनापुरताच मर्यादित राहिला’ या उल्लेखाबद्दल नाईक यांनी सारी जबाबदारी त्यांच्या नंतर पदावर आलेल्या पेट्रोलियममंत्र्यांवर झटकली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींना १४.५ किलोऐवजी पाच किलोचे सिलिंडर देण्याची योजना होती. पण माझ्यानंतर या मंत्रिपदावर आलेल्या मणिशंकर अय्यर, मुरली देवरा, जयपाल रेड्डी आणि विरप्पा मोईली या काँग्रेसच्या मंत्र्यांनी कामात रस घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प पूर्ण न होण्यास काँग्रेसचे मंत्री जबाबदार – राम नाईक
पालघर तालुक्यातील वेळगाव येथे घरगुती गॅस सिलिंडर भरण्याचा प्रकल्प पूर्ण न होण्यात माझ्यानंतर आलेले पेट्रोलियम खात्याचे काँग्रेसचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी केला.‘
First published on: 17-05-2013 at 04:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress to be responsible for the project incomplete ram naik