मुंबई : गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणपती मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया येत्या ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गेली दहा वर्ष शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या, कोणतीही तक्रार नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गणेशोत्सवाला आता जेमतेम एक महिना शिल्लक असून गणेशोत्सव मंडळांची तयारी सुरू झाली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या गणेशमूर्तींचे आगमन सुरू होते. त्यामुळे मंडपांच्या परवानगीसाठी पालिकेची यंत्रणाही सज्ज झाली असून राज्य सरकारच्या निर्णयानुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल.
एक खिडकी योजनेनुसार ६ ऑगस्टपासून संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून नियमानुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल.
१०० रुपये शुल्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सन २०२४ च्या उत्सवासाठी अवघे १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
५०० टन मोफत शाडू माती वाटप
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहील. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजना देखील राबविण्यात आली आहे. आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज आले आहेत. आतापर्यंत मोफत शाडू मातीसाठी एकूण २१७ मूर्तिकारांनी मागणी केली असून, त्यांना आतापर्यंत सुमारे ५०० टन मोफत शाडू माती देण्यात आली आहे. त्यामुळे शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती स्थापना करण्याचे प्रमाण यंदा वाढणार आहे.