मुंबई : लोअर परेलच्या पुलावर पदपथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून या पुलाच्या कडेला पदपथाची निर्मिती करावी, असे निर्देश पालकमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. तीन मीटर रुंदीच्या पदपथाची निर्मिती करता आली नाही, तर किमान दीड मीटर रुंदीचे पदपथ तयार करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

लोअर परळचा पुलाचा बहुतांशी भाग आता सुरू झाला आहे. मात्र या पुलावर पूर्वीप्रमाणे पदपथ नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. नागरिकांनी याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा मागणीही केली होती. मात्र त्यास प्रशासनाने नकार दिला होता. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार पुलांवर आता पदपथांची निर्मिती करता येणार नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या उड्डाणपुलावर रेल्वेच्या हद्दीतील भागावरच पदपथ आहेत. मात्र संपूर्ण पूलावर पदपथ नाहीत.

Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…
Thane Passengers loot rickshaw, Thane rickshaw meter, Thane, rickshaw meter,
ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

हेही वाचा >>> बीडीडी चाळ पुनर्विकासातील दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला पहिल्या टप्प्याच्या कामाचा आढावा

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळ ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर हा पूल बांधण्यात येत आहे. करी रोडच्या बाजूचे आता थोडेच काम शिल्लक आहे. या पुलावर पादचाऱ्यांसाठी पदपथ नसल्यामुळे लोअर परळ स्थानकातून करी रोड स्थानकापर्यंत पायी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे पदपथाची मागणी होते आहे. लोअर परेल परिसरात मोठमोठी कार्यालये असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नोकरदार मंडळी येत-जात असतात. त्यामुळे लोअर परेल स्थानकाबाहेरील चिंचोळ्या गल्लीत सकाळ संध्याकाळ खूप गर्दी होत असते. त्यामुळे उड्डाणपुलावर पदपथाची गरज असल्याचे प्रवाशांचेही म्हणणे आहे.

हेही वाचा >>> माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच

दिपक केसरकर यांनी गणेशोत्सवापूर्वी या पुलाच्या करी रोडच्या बाजूचे लोकार्पण केले. मात्र अद्याप पदपथांबाबत काहीही निर्णय न झाल्यामुळे केसरकर यांना महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, पदपथ बांधण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लोअर परेल पूल हा रेल्वे आणि महानगरपालिका यांनी मिळून बांधला आहे. रेल्वेच्या हद्दीतील ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेले रेल्वेला निधी दिला आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा १ अशा तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीच्या पोहोच रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करीत आहे.