लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले असून या प्रकल्पातील गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग ४८ वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील पंचलाईजवळील वाघलधारा गावात राष्ट्रीय महामार्ग ४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम नुकताच पूर्ण झाले. सुरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान नवसारी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ ओलांडणारे दोन प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पूल यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. या पुलांची लांबी अनुक्रमे २६० मीटर आणि २१० मीटर आहे. वाघलधाराजवळ हा नव्याने बांधलेला पूल वापी आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे.

आणखी वाचा-Mumbai Crime News : चोरी करायला काहीच मिळालं नाही म्हणून महिलेचं चुंबन घेऊन पळाला चोर, मुंबईतल्या मालाडमधली घटना

राष्ट्रीय महामार्ग ४८ हा भारतातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. त्यामुळे वाहने आणि कामगार दोघांच्याही सुरक्षिततेची खात्री केली. बांधकामादरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अतिरिक्त मार्गिका बांधण्यात आल्या होत्या. महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवून योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती एनएचएसआरसीएलकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of 210 meter long bridge on bullet train route on national highway 48 in gujarat completed mumbai print news mrj