मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर स्थानकात चार नवीन उप रेल्वेमार्गिका (स्टेबलिंग साइडिंग्स) साकारल्या आहेत. गेल्या ११ महिन्यांत या चारही मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून या कामामुळे ६ लोकलला एकाच ठिकाणी उभे करण्यासाठी जागा तयार झाली आहे.

मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) यांच्याद्वारे जुईनगर स्थानकावर ६ लोकल रेक उभ्या राहू शकतील, यासाठी स्टॅबलिंग साइडिंग तयार केली जात होती. तसेच इंटरलॉकिंगचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये हाती घेतले होते. त्यानुसार चार नवीन स्टॅबलिंग साइडिंग्स तयार करून यापैकी २ मार्गिकांवर प्रत्येकी दोन आणि उर्वरित दोन मार्गिकांवर प्रत्येकी एक लोकल अशा एकूण ६ लोकल उभ्या केल्या जाऊ शकतात. या उभ्या केलेल्या लोकलची तपासणी, देखभाल-दुरुस्ती त्वरित केली जाऊ शकते. तसेच जुईनगरला चार नवीन स्टॅबलिंग साइडिंग्स तयार केल्याने पनवेल-वाशी विभागातील लोकलचे डबे जुईनगरला उभे केले जातील. तसेच लोकल मोटरमन आणि गार्ड यांच्यासाठी याठिकाणी नवीन रनिंग रूमदेखील रविवारपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा – ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ अभियानला रायगडमधून सुरुवात

जुईनगर येथील सिग्नल यंत्रणादेखील अद्ययावत करण्यात आली आहे. यामुळे लोकल सेवा अधिक सुरळीत झाली आहे.

हेही वाचा – मुंबईतील हॉटेलांना मेलेल्या कोंबड्यांची विक्री, मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले

३९ कोटींचा संपूर्ण प्रकल्प

मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीने सप्टेंबर २०२२ मध्ये जुईनगर चार नवीन स्टॅबलिंग साइडिंग्सचे काम हाती घेतले. ऑगस्ट २०२३ मध्ये म्हणजे ११ महिन्यांत काम पूर्ण झाले. या प्रकल्पाची किंमत ३९ असून यांपैकी अभियांत्रिकीसाठी २४ कोटी, सिग्नलिंगसाठी ९.५ कोटी आणि विद्युतकामांसाठी ५.५ कोटी रुपये खर्च आला आहे.

Story img Loader