मालाड पश्चिमेकडील मालवणी नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पालिकेने कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. तसेच कंत्राटदाराला ५० हजाराचा दंड केला आहे.
हेही वाचा- मुंबईतून चार बांगलादेशी नागरिकांना अटक; बनावट कागदपत्रांद्वारे बनवले भारतीय पारपत्र
मालाड पश्चिमेला मालवणी गेट क्रमांक ६ जवळ असलेल्या नाल्याच्या काठावर पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. अब्दुल हमीद रोड ते नॅशनल स्कुलपर्यंत ही भिंत बांधण्यात आली होती. मात्र या भिंतीचे निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. भिंत आतल्या बाजूला कललेली होती. तसेच भिंत बांधण्यासाठी वापरलेला कच्चा माल निकृष्ट दर्जाचा होता अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. त्यानंतर पी उत्तर विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता काम निकृष्ट असल्याचे होते. त्यामुळे कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. ५० हजाराचा दंड केला आहे. भिंतीचे बांधकाम पुन्हा करण्यास सांगितले आहे. तसेच निविदेतील अटीनुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.