लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचा अपघात होऊ नये, जिना चढताना त्रास होऊ नये यासासाठी उद्वाहन आणि सरकते जिने उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेवरील खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे हजारो प्रवाशांना या ‘एलिव्हेटेड डेक’चा लाभ होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) व्यक्त केला.

आणखी वाचा-राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करणार

काही मिनिटांच्या बचतीसाठी आणि जिन्याच्या पायऱ्यांवर चढ-उतार करण्यासाठी अनेक प्रवासी कंटाळा करतात. प्रवासी जीव धोक्यात घालून सर्रास रेल्वे रूळ ओलांडतात. काही वेळा प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू होतो, तर काही प्रवासी जखमी होतात. त्यामुळे स्थानकात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एमआरव्हीसीने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्थानक सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम रेल्वेवरील ७ आणि मध्य रेल्वेवरील १० स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यापैकी खार रोड स्थानकावर डेक तयार करण्यात आला आहे. तसेच इतर पायाभूत कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Story img Loader