समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी मुंब्रा येथे घडली. या प्रकरणी कंटेनर चालकास अटक करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरील अटलान्टा टोलनाका चालकाने वाहतूक चुकीच्या दिशेने सुरू करून सूचना देणारे फलक न लावल्याने, या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
रियाज शेख (४०, रा.मुंब्रा कौसा) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी रियाज मुंब्रा येथील पर्यायी मार्गावरील गॅरेजजवळून पायी जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव कंटेनरची धडक बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रा पोलिसांनी बाबूलाल कौशलप्रसाद यादव (२४) या कंटेनर चालकाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Container hits kills pedestrian