शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज ( १३ जून ) पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?
Pimpri, Pimpri property under tax, Pimpri latest news,
पिंपरी : अडीच लाख मालमत्ता कर कक्षेत, ३०० कोटींचा महसूल वाढणार
Union Home Minister Vigilance Medal to Police Inspector Ankush Chintaman
अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
number of teachers declined
शिक्षकांची पदसंख्या घटणार, विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती
Despite objections applications of MLA Rohit Pawar and MLA Ram Shinde were approved karjat news
हरकतीनंतरही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांचे अर्ज मंजूर; मात्र हरकतीचा मुद्दा न्यायालयात जाणार

हेही वाचा : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले?

  • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.
  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.
  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.
  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.
  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.
  • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.
  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.
  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.
  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.
  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.