लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि स्वच्छता सेवकांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला

भाईंदर पश्चिम येथे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. या रुग्णालयाची उभारणी २०१६ साली महापालिकेकडून करण्यात आली होती. परंतु आर्थिकदृष्ट्या हे रुग्णालय चालवणे पालिकेला शक्य नसल्याने  २०१९ साली ते राज्य शासनाकडे हस्तांतरित  करण्यात आले. तेव्हा पासून या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी ही राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत पार पडली जात आहे. करोना काळात या रुग्णालयाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती.त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकाच्या मंजुर पदाची पूर्तता शासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय कंत्राटी पद्धतीने देखील डॉक्टर व परिचारिका भरण्यात आले आहेत.

आणखी वाचा-मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये चार नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम

परंतु रुग्णालयाचे व्यवस्थापन हाताळण्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असून कंत्राटी परिचारिकांना वेतन मिळणे कठीण झाले आहे. सध्या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने एकूण ५५ परिचारिका कार्यरत आहेत. तर जेमतेम १० सफाई कर्मचारी आहेत. या दोघांना मागील तीन महिन्यापासून वेतन देण्यात आलेले नाही. शिवाय ही परिस्थिती मागील दोन वर्षांपासून सातत्याने उद्भवत आहे. त्यामुळे यावेळी वेतन न दिल्यास काम बंद करणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून सात दिवसापूर्वी देण्यात आला होता. परंतु या गोष्टीची दखल शासनाने न घेतल्यामुळे शनिवारी हे कर्मचारी संपावर गेले असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नसल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयात प्रचंड प्रमाणात मनुष्य बळाची कमतरता निर्माण झाली असून रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर जाफर तडवी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Story img Loader