मुंबई : वांद्रे येथील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराला दोन वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. लाटांसोबत समुद्रकिनाऱ्यावर येणारा कचरा, गाळ उचलून स्वच्छता करणे आणि तो क्षेपण भूमीवर वाहून नेण्याचे काम या कंत्राटदाराला करावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिका या कामासाठी ९४ लाख रुपये खर्च करणार आहे.

देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. मुंबईमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर आढळतात. तसेच शनिवारी आणि रविवारी स्थानिक नागरिकांचीही समुद्रकिनाऱ्यांवर मोठी वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यांवर लाटांसोबत दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ येतो. तो उचलून कचरा भूमीत वाहून न्यावा लागतो. त्यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. दररोज सकाळी साफसफाई करून समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यात येते. या कामासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.

Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Mumbai Ravi Raja opposed for Municipal administration decided to tax commercial slums
व्यावसायिक स्वरुपाच्या झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास विरोध, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचे आयुक्तांना पत्र
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
CIDCO to begin construction of Kondhane Dam project soon navi Mumbai news
महामुंबईच्या पाण्याची आता कोंढाणेवर मदार; सात वर्षांनंतर धरणाच्या बांधणीसाठी हालचालींना वेग
enlist traffic police to stop car racing on coast road
सागरी किनारा मार्गावरील भरधाव गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार
sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस

हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

वांद्रे येथील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने यापूर्वी दिलेल्या दोन वर्षांच्या कंत्राटाची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तीन महिन्यांसाठी कंत्राटदार नेमून स्वच्छतेचे काम करून घेतले. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी नवीन कंत्राट देण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून कंत्राटदाराच्या निवडीबाबतचे प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी ९४ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे.

Story img Loader