लोकसता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने मुंबईत अतिवृष्टीमुळे एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्य करणे सोयीचे व्हावे यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठी यंदा यंत्रणा वृद्धींगत करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रथमच मनुष्यबळासह विभागीय नियंत्रण कक्ष सुसज्ज करण्यात आले आहेत.

kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
A fire broke out at a building in Goregaon Mumbai print news
गोरेगाव येथील इमारतीला भीषण आग; दिवाळीत मुंबईत आगीचे सत्र सुरुच
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस
Municipal Commissioner celebrated Diwali with the sweepers
पालिका आयुक्तांची सफाई कामगारांसोबत दिवाळी, कामगारांच्या वसाहतीला सपत्नीक भेट
Transfers of 28 police officers before assembly elections 2024
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८ अधिकाऱ्यांच्या बदल्या
agricultural university to give botanical garden land to pmc for sewage treatment project
महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विद्यापीठाचे मोठे पाऊल !

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. या काळात झाडे पडणे, इमारतीची पडझड, पाणी तुंबणे अशा घटना घडतात. एका तासात जास्त पाऊस पडल्यास पूर येतो, कधी नाल्यात कोणी वाहून जातात, कुठे दरड कोसळते अशाही दुर्घटना घडतात. अशा वेळी मुंबईतील सर्व प्राधिकारणांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष करीत असते. नागरिकांना एखाद्या दुर्घटनेची माहिती महानगरपालिकेला देता यावी, तसेच मदत मागता यावी यासाठी महानगरपालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे.

आणखी वाचा-Video : मुंबईकरांनो काळजी घ्या! आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, ‘बिपरजॉय’मुळे वरळी सीफेसला उधाण

महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह विभागीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात बिनतारी यंत्रणा व चार हॉट लाईन्सही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे.

नागरिकांना आपत्‍कालीन परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्‍या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्‍यास त्‍यांनी खालील माध्‍यमांचा वापर करावा –

१९१६ मदतसेवा क्रमांक
संकेतस्‍थळ – dm.mcgm.gov.in
मोबाईल ॲप – Disaster Management BMC
इन्‍स्टाग्राम – my_bmc
ट्वीटर हॅन्‍डल – @mybmc
फेसबुक – myBmc
यूट्युब – MyBMCMyMumbai
चॅटबॉट क्रमांक – ८९९९२२८९९९
विभागीय नियंत्रण कक्ष

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

अनु क्र. – विभागाचे नाव – दूरध्वनी क्रामांक
१ – ए – २२६२४०००
२ – बी – २३७९४०००
३ – सी – २२०१४०००
४ – डी – २३८६४०००
५ – ई – २३०१४०००
६ – एफ दक्षिण – २४१०३०००
७ – एफ उत्तर – २४०८४०००
८ – जी दक्षिण – २४२२४०००
९ – जी उत्तर – २४३९७८८८ / २४२१२७७८
१० – एच पूर्व – २६११४०००
११ – एच पश्चिम – २६४४४०००
१२ – के पूर्व – २६८४७०००
१३ – के पश्चिम – २६२३४०००
१४ – एल – २६५०५१०९/८६५२७५०४०५
१५ – एम पूर्व – २५५५८७८९
१६ – एम पश्चिम – २५२६४७७७
१७ – एन – २५०१३०००
१८ – पी दक्षिण – २८७२७०००
१९ – पी उत्तर – २८८२६०००
२० – आर दक्षिण – २८०५४७८८
२१ – आर उत्तर – २८९३६०००
२२ – आर मध्य – २८९३११८८
२३ – एस – २५९५४०००
२४ – टी – २५६९४०००