मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे रुग्णसंख्येत घट झाली आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये नव्याने आढळलेल्या तसेच एकूण क्षय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. औषध प्रतिरोध क्षयरोग बरा होण्याचा दर २०२० मध्ये ७२ टक्के इतका असून २०२१ मध्ये तो ७७ टक्के होता. औषध प्रतिरोध क्षयरोग बरा होण्याचा दर २०२२ मध्ये ८४ टक्के तर २०२३ हाच दर ८२ टक्के झाला आहे.

मुंबईत २०२२ मध्ये ५५ हजार २८४ क्षयरुग्ण आढळले होते. तर २०२३ मध्ये या रुग्णांची संख्या ५० हजार २०६ इतकी होती. २०२३ मध्ये एकूण १ लाख ८२ हजार ८ इतक्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये पुरुष क्षयरुग्ण आणि स्त्री क्षयरुग्ण यांचे प्रमाण जवळपास समान होते. २०२२ मध्ये आढळलेल्या ५५ हजार २८४ रुग्णांमध्ये औषध संवेदनशील क्षयरोग रुग्णाची संख्या ४९ हजार ५८६, तर औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या ५ हजार ६९८ इतकी आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या ४ हजार २८५, तर फुप्फुसाव्यतिरिक्त १९ हजार ९२० जणांना क्षयरोगाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये आढळलेल्या ५० हजार २०६ रुग्णांमध्ये औषध संवेदनशील क्षयरोग रुग्णांची संख्या ४५ हजार ४१३, तर औषध प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची संख्या ४ हजार ७९३ इतकी आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या ४ हजार ०६६ तर फुप्फुसाव्यतिरिक्त १८ हजार २६६ जणांना क्षयरोगाची लागण आहे.

Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Does the government want to resolve the Pathi dispute or not
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाही?
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
Nandurbar district fund for Sickle cell medicine
सिकलसेल औषध खरेदीचा निधी वर्षभरापासून पडून, नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता
homeopathic doctors allows to prescribe allopathic medicines
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज
A single cigarette costs men 17 minutes of their life and women
एका सिगारेटमुळे पुरुष गमावतात आयुष्यातील १७ मिनिटे आणि महिला २२ मिनिटे; संशोधनातून धक्कादायक खुलासा….

हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

दोन वर्षांच्या आकडेवारीवरून मुंबईतील रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील रुग्णसंख्येत एकीकडे घट झालेली असतानाच दुसरीकडे मुंबईबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. २०२२ मध्ये मुंबईबाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ४६३ इतकी होती. २०२३ मध्ये या रुग्णांची संख्या १३ हजार ३६९ इतकी झाली आहे.

मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २४ विभागात प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अतिजोखीम गटातील रुग्णांचे बीसीजी लसीकरण, रुग्णांचा आहार आणि रुग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसारच क्षयरोग निर्मूलनासाठी आगामी दिवसात जनजागृतीपर सर्व विभागात कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा – शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!

सद्यस्थितीत मुंबईत ४२ सीबीनॅट यंत्र, २४ ट्रूनॅट यंत्र, ३ कल्चर आणि डीएसटी लॅब याद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच २५ सार्वजनिक क्षेत्रातील आणि ६ खाजगी केंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधा रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत मुंबईच्या सर्व २४ विभागात प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एप्रिल २०२४ मध्ये आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाईल. मे २०२४ मध्ये लसीकरण केले जाईल. मुंबई जिल्ह्यात २०२२-२०२४ मध्ये ८८ हजार ८९ इतक्या पोषण आहार कीटचे वाटप झाले आहे. त्याचा १९ हजार ८१८ क्षयरुग्णांना लाभ झाला आहे. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या निवडक खासगी डॉक्टर आणि खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा क्षयरुग्णांचे निदान व उपचार मोफत उपलब्ध आहेत.

९२१ संभाव्य रुग्णांचा शोध

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्ष-किरण सेवा आणि संशयित क्षयरुग्ण तीन मिनिटांच्या आत ओळखण्यासाठी गेल्या दोन वर्षांत ‘क्षयरोग रोखा’ आणि क्यूआर एआयच्या भागीदारीत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एकूण ९० हजार ७५१ क्ष-किरण काढण्यात आले असून ९२१ एवढे क्ष-किरणांमध्ये संभाव्य क्षयरुग्ण आढळले आहेत. तसेच या सर्व क्षयरुग्णांचा वैद्याकीय पाठपुरावा करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

थुंकी नमुना प्रणाली

थुंकी नमुना घेऊन वैद्यकीय चाचणी करताना मागोवा घेण्यासाठी क्यूआर कोड आधारित प्रणालीची पथदर्शी यशस्वी चाचणी केल्यानंतर मुंबईतील सर्व विभागांमध्येही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने आणि चाचणी करण्यासाठी लागलेला प्रत्यक्ष वेळ यावर देखरेख ठेवण्यासाठी मदत होईल.

Story img Loader