मुंबई : वादग्रस्त निवृत्त सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची मुख्यमंत्री कार्यालयात पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या ‘वॉर रुम’च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची शक्यता ‘लोकसत्ता’ने आठवडय़ाभरापूर्वीच वर्तवली होती़

सरकारी सेवेत असताना मोपलवार यांच्यावरील आरोपांमुळे विधानसभेचे एक दिवसाचे कामकाज वाया गेले होते. सेवेतील सनदी अधिकाऱ्यामुळे विधिमंडळाचे कामकाज तहकूब होण्याचा राज्याच्या इतिहासातील बहुधा एकमेव प्रसंग असावा. आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होऊनही तत्कालीन फडणवीस सरकारने मोपलवार यांना अभय दिले होते. २०१८ मध्ये निवृत्तीनंतर त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप असलेल्या मोपलवार यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘वॉर रुम’चे महासंचालकपद सोपविण्यात आले आहे. पायाभूत सुविधांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी  ‘वॉर रुम’ सुरू करण्यात आले आहे. या स्वतंत्र यंत्रणेच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोपलवार यांच्या नियुक्तीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. ते रुजू होतील त्या तारखेपासून मुख्यमंत्र्यांच्या पुढील आदेशापर्यंत ही नियुक्ती असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मोपलवार यांना फडणवीस आणि ठाकरे सरकारच्या काळात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असल्यानेच मोपलवार यांना झुकते माप मिळत गेले. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर वादग्रस्त अशी प्रतिमा असलेल्या मोपलवार यांची थेट मुख्यमंत्री सचिवालयातच नियुक्ती करण्यात आल्याने मंत्रालयात नव्याने चर्चेला तोंड फुटले आह़े

एक कोटीच्या बेहिशेबी व्यवहाराची ध्वनिफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर मोपलवार हे वादग्रस्त ठरल़े  ध्वनिफितीत मोपलवार यांच्याशी संभाषण करणाऱ्या व्यक्तीला मागील भाजप सरकारच्या काळात ‘मोक्का’ कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. तसेच मोपलवार हे पूर्णपणे निर्दोष असल्याचा निर्वाळा तेव्हा भाजप सरकारने दिला होता.

प्रकल्पांची वेगवान अंमलबजावणी?

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी ‘वॉर रुम’च्या सुरू करण्यात आल्याचे सरकारी आदेशात म्हटले आह़े मात्र, मोपलवार यांना मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वेळोवेळी मुदतवाढ देऊनही समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अद्यापही वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचे अनेक मुहूर्त जाहीर झाल़े  पण, हा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. अशा या अधिकाऱ्याकडे प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी ‘वॉर रुम’ची जबाबदारी कशी सोपविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े

Story img Loader