मुंबई : कोण संजय राऊत, असा खोचक प्रश्न करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राऊत यांच्या थुंकण्यावरून टीका करताच राऊत यांचीही जीभ घसरली. यामुळे महाविकास आघाडीत एकी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना पवार आणि राऊत यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माध्यमांसमोर संजय राऊत थुंकले होते. यावरून राऊत यांच्यावर टीकाही झाली. मग राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मी थुंकलो नव्हतो वगैरे खुलासा केला.
राऊत यांच्या थुंकण्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संजय राऊत किंवा कोणीही बोलताना संयम राखला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर खालच्या थरावर जाऊन टीका करण्याची राज्याची संस्कृती नव्हे, असे खडे बोलही अजित पवार यांनी राऊत यांना सुनावले होते. त्यावर ‘धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले’, असे प्रत्युत्तर राऊत यांनी पवार यांना दिले. मागे अजित पवार यांनी धरणात पाणी सोडण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. हा संदर्भ घेत राऊत यांनी अजित पवार यांना सुनावले.

गेले काही दिवस अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. राष्ट्रवादीबद्दलच्या राऊत यांच्या भूमिकेवरून अजित पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. तसेच कोण संजय राऊत? असा सवालही जाहीरपणे केला होता. राऊत हे कायम शरद पवार यांच्या संपर्कात असतात. किंबहुना महाविकास आघाडीचा प्रयोग पवार आणि राऊत यांच्यामुळेच आकारास आला होता. पण राऊत आणि अजित पवार यांच्यात अजिबात समन्वय नसल्याचे सातत्याने अधोरेखित होत आहे.

Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत?
शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना का वाटतंय?
Story img Loader