मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित वक्तव्याच्या चित्रफितीमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटताच आमच्या संभाषणात फेरफार करून सरकार आणि समाजात दुही निर्माण करण्याचा खोडसाळपणा करण्यात आल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून समाजबांधवांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जरांगे यांनी अट घातली असली तरी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जालन्याला जाण्याचे टाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे-पाटील यांनी यांनी जालना जिल्ह्यात सुरू केलेल्या उपोषण, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या कथित संभाषणाची चित्रफीत  समाजमाध्यमांवरून प्रसारित  झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही ही चित्रफीत ट्वीट करीत सरकारवर टीका केली.

हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा

मुख्यमंत्र्यांनी मात्र हा खोडसाळपणा असल्याचे सांगत आरोप फेटाळले आणि मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले. मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्दय़ांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा आम्ही करीत असताना आमचा संवाद ‘समाजमाध्यमांवरून’ चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे खोडसाळपणाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दौरा लांबणीवर

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यावे, अशी अट घातली आहे. यानुसार शिंदे सायंकाळी जालन्याला जाणार असल्याची चर्चा होती. उपोषण सोडण्यासाठी जालन्यात जाण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे उत्सुक नव्हते. मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना एवढे महत्त्व द्यावे का, अशी चर्चा सरकारच्या पातळीवर होती. ‘जरांगे यांच्याशी मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चा करीत असून आपणही काल त्यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चा झाल्यावर त्यांना भेटण्याबाबतचा निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

त्या कथित चित्रफितीत संवाद?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे.

उपमुख्यमंत्री अजित पवार : हो.. यस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : माइक चालू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy due to chief minister tape avoided going to jalna eknath shinde ysh
Show comments