मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीच्या करोनाकाळात झालेल्या सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर फाशी दिल्यावर दहशतवादी य् मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी देणे आणि त्यासाठी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याचे काम तत्कालीन भाजपच्या सरकारने केले. मुळात मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करीत भाजपवरच पलटवार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेंग्विन सेना वानखेडे मैदान उखडायला गेली होती. मग आता याकूब मेमनची कबर उखडून दाखवावी, असे आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी दिले. मैदाने, उद्याने, स्मशानभूमीच्या सुशोभीकरण, देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची असते. महापौर शिवसेनेचा होता व मुख्यमंत्रीपदी ठाकरे होते. मग कबरीच्या सुशोभीकरणासाठी ठाकरे यांनी परवानगी कशी दिली, असा प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला. नवाब मलिक, अस्लम शेख व तुकडे तुकडे टोळीला खूश करण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला.

आदित्य ठाकरे यांचे प्रत्त्युत्तर

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यास आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.  मेमनची कबर असलेली दफनभूमी ही खासगी ट्रस्टची आहे.  मेमनचा दफनविधी झाला तेव्हा राज्यात भाजपचे सरकार होते. त्या वेळी दहशतवाद्याच्या दफनविधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. याउलट देशात व राज्यात पूर्वीच्या सरकारने  कसाब व अफजल गुरू या दहशतवाद्यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे मृतदेह अज्ञातस्थळी दफन केले. कुटुंबीयांना दफनविधीसाठी दिले नव्हते. भाजप सरकारने  मेमनला दहशतवाद्यासारखी वागणूक का दिली नाही.  मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy erupted over the beautification of yakub memon grave zws