मुंबई : मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जाणार असून या पदासाठी मुंबई महापालिकेने ठेवलेल्या जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. मात्र ही भरती प्रक्रिया वादात सापडली आहे.

Avoid paying salary to ST employees before Diwali citing code of conduct
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत नवीन घडामोड, दिवाळीपूर्वी…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Loksatta article on Competitive Examination education
स्पर्धा परीक्षा देणं उत्तमच, पण किती काळ? पुढे काय?
india post payments bank recruitment to the post of executive for 344 vacancies on contractual basis
नोकरीची संधी : ग्रामीण डाक सेवकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह’ पदाची भरती
PGCIL Trainee Recruitment 2024 Applications begin for 795 posts link to register here
PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
Mumbai airport jobs
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ड्युटी पदांची भरती
MLA Dadarao Keche himself announced that he will file an application for BJP on 28th
‘मी २८ तारखेस भाजपतर्फे अर्ज भरणार’ या उमेदवाराने स्वतःच केले जाहीर…

हेही वाचा…मुंबईत पाच दिवस पोलीस बंदोबस्त

या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही लिपिक पदाला अशी अट नव्हती. युपीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अशी अट कधीच नव्हती, असे मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे यांनी व्यक्त केले आहे. ही अट काढून टाकावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या अटीविरोधात शिवसेना ठाकरे गटानेही संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून या पदभरतीमधील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे. पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे, ही जाहिरातीमधील जाचक अट रद्द करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा…मुंबई आणि ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

तसेच काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन परीक्षा नियुक्तीपासून २ वर्षात उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. ती सरसकट सर्वच उमेदवारांना लागू करावी. जेणेकरून उच्चशिक्षित उमेदवारही अर्ज करू शकतील.

हेही वाचा…महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद करण्यास मज्जाव, बंद बेकायदा असताना तो पुकारलाच कसा ? उत्तर दाखल करण्याचे आदेश

पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांची मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतात, पदवी / द्वीपदवीधर होतात. परंतु अनुकंपा तत्वावर किंवा अग्रहक्काने नोकरी मिळविण्याची वेळ येते तेव्हा विषयांकीत अटीमुळे त्यांना ‘कामगार’ पदासाठीच पात्र ठरविले जाते. म्हणजेच पदवी / द्वीपदविधर असूनही त्यांना ‘लिपिक’ पदी नियुक्ती दिली जात नाही. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.