मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारफलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आल्याने नवीन वाद सुरू झाला आहे. या उल्लेखावरून  आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी टीकेची झोड उठविली आहे. हवामहल मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी शिंदे गेले होते. त्यांच्या फलकावर शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आला होता.त्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आदित्य ठाकरे व खासदार राऊत यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किती दिखाऊपणा करणार? काहीही केले, तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही आणि हे सरकार ३१ डिसेंबरनंतर जाणारच, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी बेइमानी करणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असावी. त्यांनी कोणते महान कार्य केले आहे, ते पाहिले पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा >>>अँटेलिया प्रकरणातला आरोपी सचिन वाझे दत्तक घेणार मांजरीचं पिल्लू, न्यायालयात केला अर्ज

महायुतीच्या नेत्यांचे प्रत्युत्तर

 बाळासाहेबांच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी विचारांचे वारसदार  शिंदे आहेत. ते कधीही स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेत नाहीत व घेणारही नाहीत. कोणीही तेवढे मोठे  नाही.

बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेते व मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे. शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वासाठी मोठा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. पण त्याचे राजकारण व बाऊ करणे गैर असल्याचे ज्येष्ठ भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.