मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट युतीने १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आगामी महापौर हा भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी व्यक्त केला. ठाकरेंच्या ‘किंचित’ शिवसेनेपेक्षा शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची कामगिरी चांगली असेल, असे भाकितही त्यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात शेलार बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आगामी महापालिका निवडणुकांची तयारी, मुंबईच्या विकासासाठीचा दृष्टिकोन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांची तुलना, युतीतील ताणतणाव, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात भाजपचे त्यांच्याशी असलेले संबंध आदी राजकीय विषयांसह मुंबईतील रात्रजीवन, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ अशा अनेक प्रश्नांना शेलार यांनी मनमोकळी उत्तरे दिली. ‘‘उद्धव यांच्या काळात शिवसेनेचे वर्तन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना यात मोठा फरक असल्याचा भाजपचा अनुभव आहे. बाळासाहेब ठाकरे दिलदार होते, त्यांच्याशी संवाद होत होता आणि हिंदूत्वासाठी आमची युती होती. उद्धव ठाकरे हे अहंकारी असून ‘भाजपबरोबर युतीत शिवसेना २५ वर्षे सडली’, असे ते म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत २०१७मध्ये आणि विधानसभा निवडणुकीत २०१४मध्ये एका जागेसाठी युती तोडली. २०१९मध्ये पुन्हा त्यांनी भाजपशी युती केली. मोदी यांच्या छायाचित्राचा वापर करूनच शिवसेनेने मते मिळविली होती, याचा त्यांना बहुधा विसर पडला असावा. त्यांच्या वागण्या -बोलण्यात काहीच तारतम्य नसते’’, अशी टीकाही शेलार यांनी केली.
देश हुकूमशाहीकडे चालला आहे, या विरोधकांच्या टीकेला कोणताही अर्थ नसून, भाजपमध्ये पक्षांतर्गत लोकशाही आहे, असे शेलार म्हणाले. पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास असून, त्यांना भरभरुन पाठिंबा मिळतो. त्यामुळे मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महापालिका निवडणुकीत भाजपचा चेहरा राहतील, असे शेलार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईचा कायापालट करण्यासाठी सहा महिन्यांच्या काळात अनेक निर्णय वेगाने घेतले असून, त्यांचा पक्षही वाढत आहे. ठाकरे गटाने महापालिकेत सत्ता असूनही एकही काम किंवा प्रकल्प पूर्णत्वास नेला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिकेत दरोडा घातला. त्यांचे अर्धवट किंवा हाती न घेतलेले प्रकल्प आवश्यक मंजुऱ्या आणि निधी मिळवून आम्ही सुरु केले आहेत. ८० हजार कोटींच्या मुदतठेवी असतानाही त्यांनी काम केले नाही. मात्र, सत्ता आल्यावर आम्ही त्या जोरावर आठ लाख कोटी रुपयांची कामे करुन दाखवू, असे शेलार म्हणाले.
मुंबईत सरसकट रात्रजीवन सुरु करण्यास भाजपचा विरोध असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. रहिवाशांना त्रास न होता रोजगारभिमुख व्यवसाय रात्रीही सुरु ठेवण्यास मात्र त्यांनी पाठिंबा दर्शविला. मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण स्वत: त्यातूनच प्रवास करणार असल्याचेही शेलार म्हणाले. प्रारंभी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शेलार यांचे स्वागत केले.
निवडणुकीत रंग भरायचे आहेत..
महापालिकेत उद्धव ठाकरे यांची ‘किंचित सेना’ हीच प्रमुख प्रतिस्पर्धी असून आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही. मात्र निवडणुकीमध्ये अद्याप रंग भरायचे आहेत. पक्षाचा अजून विस्तारही होऊ शकतो. सर्व रणनीती आत्ताच उघड करणार नाही. मनसेबरोबर युती करण्याबाबत अद्याप काही ठरले नसून, अशा चर्चा करणे हे मनसेवरही अन्याय करणारे आहे, असे शेलार म्हणाले.