मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा, परळ रेल्वे कारखान्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत जुन्या ५७ आयसीएफ डब्यांचे रुपांत चार अपघात निवारण ट्रेन डब्यांत आणि अद्ययावत मालगाडीमध्ये (ऑटोमोबाईल कॅरियर) करण्यात आले. रतीय रेल्वेमध्ये सर्वप्रथम मध्य रेल्वेने चारचाकी गाड्या (ऑटोमोबाइल) लोड करण्यासाठी साइड एंट्री आणि इतर सुधारणा करून मालगाडीचा अद्ययावत डबा विकसित केला आहे. हे काम माटुंगा आणि परळ कारखान्यात वेगात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने चारचाकी वाहनांची वाहतूक करणे शक्य होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत ५४७ रेकमधून ७४,३१८ मोटारींची वाहतूक केली. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४८१ रेकमधून ५७,४३१ मोटारींची वाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २९.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर १८७९ साली वाफेवरील इंजिन तयार करण्यासाठी परळ कारखाना उभारण्यात आला होता. तर १९१५ साली रेल्वे डबे आणि इंजिन दुरुस्तीसाठी माटुंगा कारखाना उभारण्यात आला. या कारखान्यात डिझेल, विद्युत रेल्वे इंजिन, नॅरोगेज लोको तयार करण्यात येत असून त्यांची देखभाल-दुरूस्ती केली जाते.

हेही वाचा >>> रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला उच्च न्यायालयात दिलासा

तसेच एलएबीडब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम येथे केले जाते. यासह २० वर्षे पूर्ण झालेल्या आरसीएफ डब्यांना नवीन सुधारित मालडब्यामध्ये  रूपांतरित केले जाते. यातून मोटारींची वाहतूक केली जाते. सप्टेंबर २०२३ मध्ये परळ वर्कशॉपमध्ये सहा आयसीएफ डब्यांपासून ऑटोमोबाईल कॅरिअर तयार केली आणि एक आयसीएफ डब्यापासून  एक अपघात निवारण ट्रेन डबा केला. तर माटुंगा वर्कशॉपमध्ये एका आयसीएफ डब्याचे एका ऑटोमोबाईल कॅरियरमध्ये रूपांतर केले, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversion of old 57 railway coaches into modern freight trains mumbai print news ysh