सुशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दृक्श्राव्य माध्यमातून रेल्वेचा इतिहास मांडणार, ‘व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी’चाही समावेश

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)मुख्यालयातील वस्तुसंग्रहालयाचा दिल्लीतील नॅशनल रेल्वे वस्तुसंग्रहालयाच्या पाश्र्वभूमीवर लवकरच कायापालट केला जाणार आहे. दृक्श्राव्य माध्यमातून रेल्वेचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. संग्रहालयात वापरण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानांचे नुकतेच मध्य रेल्वे मुख्यालयात सादरीकरणही झाले.

सीएसएमटी येथील मुख्यालयातील तळवजल्यावर सध्या एक छोटे वस्तुसंग्रहालय आहे. यामध्ये रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती, जुने फोटो, सीएसएमटी इमारतीचा आराखडा, रेल्वेचे छोटे इंजिनासह अन्य वस्तू आहे. या वस्तुसंग्रहालयाला आणि सीएसएमटी येथील मुख्यालयाला पर्यटकांबरोबरच विद्यार्थीही मोठय़ा प्रमाणात भेट देतात. विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये, तर अन्य पर्यटकांसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाते.

सीएसएमटीतील मुख्यालयात असणाऱ्या याच छोटय़ा वस्तुसंग्रहालयाचे रुपांतर मोठय़ा संग्रहालयात करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यासाठी मुख्यालयातील अनेक कार्यालयेही अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार होती. त्याला रेल्वे कामगार संघटनांचा विरोध पाहता प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे आता रेल्वेने सध्याच्या वस्तुसंग्रहालयातच काही बदल करून नवीन तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे वस्तुसंग्रहालयाच्या पाश्र्वभूमीवर सीएसएमटीतील वस्तुसंग्रहालयात बदल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देण्यात आली. मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांसमोर संबंधित विभागाने याचे नुकतेच सादरीकरणही केले. सध्या व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीला मोठा प्रतिसाद मिळतो. हेच तंत्रज्ञान दिल्लीच्या संग्रहालयातही आहे. मेल-एक्स्प्रेस चालवणाऱ्या लोको पायलटची जबाबदारी कशी असते किंवा मोटरमनचा लोकल चालवतानाचा अनुभव व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीतून पर्यटकांना देण्याचा प्रयत्न असेल. मुंबईत पहिली लोकल धावली आणि त्यासाठी करावे लागलेले प्रयत्न ते आतापर्यंत झालेले बदल असा इतिहासही दृक्श्राव्य माध्यमातून सांगितला जाणार आहे. यासह आणखी काही बदल करताना नवीन विद्युत रोषणाई, पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्थाही केली जाईल. यासाठी येणारा खर्च, लागणारा वेळ यावर सध्या विचार केला जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

जनसंपर्क विभागाचे स्थलांतर

सीएसएमटी मुख्यालयातील तळमजल्यावर असणारा जनसंपर्क विभाग हा विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय अथवा फलाट क्रमांक एकवर (कल्याण दिशेला) असणाऱ्या रेल्वेच्या कार्यालयात स्थलांतर करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे संग्रहालयाचा कायापालट करताना आणखी जागा उपलब्ध होणार आहे.