काही दिवसांच्या अंतराने शुक्रवारपासून थंड गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. शनिवारीही हा गारवा कायम होता. शुक्रवारप्रमाणे शनिवारी सकाळपासूनच हवेतील गारव्याचा अनुभव मुंबईकर तसेच ठाणे-डोंबिवली परिसरातील लोकांनी घेतला. वीकेण्ड असल्यामुळे संध्याकाळच्या सुखद गारव्याची मजा लुटण्यासाठी लोक मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर तसेच जुहू चौपाटीवर फिरायला आले होते. संध्याकाळी समुद्राजवळच्या परिसरांमध्ये सुसाट वारा सुटला होता. हा सुखद गारवा अनुभवत वीकेण्डला फेरफटका मारणे मुंबईकरांनी पसंत केले. कुलाबा येथे रात्री ९ वाजता किमान तापमान १६ सेल्सिअस अंश तर सांताक्रूझ येथे १२.२ सेल्सिअस अंश नोंदले गेल्याची माहिती हवामान खात्याच्या संकेतस्थळावर देण्यात आली. शुक्रवारपेक्षा शनिवारी रात्री तापमानात घट झाली आहे.
मुंबईत गारवा कायम
काही दिवसांच्या अंतराने शुक्रवारपासून थंड गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. शनिवारीही हा गारवा कायम होता. शुक्रवारप्रमाणे शनिवारी सकाळपासूनच हवेतील गारव्याचा अनुभव मुंबईकर तसेच ठाणे-डोंबिवली परिसरातील लोकांनी घेतला.
First published on: 20-01-2013 at 04:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coolness in mumbai continued