काही दिवसांच्या अंतराने शुक्रवारपासून थंड गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. शनिवारीही हा गारवा कायम होता. शुक्रवारप्रमाणे शनिवारी सकाळपासूनच हवेतील गारव्याचा अनुभव मुंबईकर तसेच ठाणे-डोंबिवली परिसरातील लोकांनी घेतला. वीकेण्ड असल्यामुळे संध्याकाळच्या सुखद गारव्याची मजा लुटण्यासाठी लोक मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर तसेच जुहू चौपाटीवर फिरायला आले होते. संध्याकाळी समुद्राजवळच्या परिसरांमध्ये सुसाट वारा सुटला होता. हा सुखद गारवा अनुभवत वीकेण्डला फेरफटका मारणे मुंबईकरांनी पसंत केले. कुलाबा येथे रात्री ९ वाजता किमान तापमान १६ सेल्सिअस अंश तर सांताक्रूझ येथे १२.२ सेल्सिअस अंश नोंदले गेल्याची माहिती हवामान खात्याच्या संकेतस्थळावर देण्यात आली. शुक्रवारपेक्षा शनिवारी रात्री तापमानात घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा