कथोरे – नाईक मनोमिलन ?
आगामी लोकसभा तसेच त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पक्षातील गटबाजी कमी करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला असून त्यातूनच ठाणे जिल्ह्य़ातील गणेश नाईक आणि किसन कथोरे या दोन नेत्यांचे मनोमिलन दस्तुरखुद्द शरद पवार यांनी घडवून आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रतिस्पध्र्यापेक्षा स्वपक्षीय नेत्यांमधील मतभेद आणि शीतयुद्धाचा निवडणुकीत जास्त फटका बसतो, हे लक्षात आल्यानेच राष्ट्रवादीमध्ये समन्वयाचे वारे वाहू लागले आहेत.
पालकमंत्री या नात्याने गणेश नाईक ठाणे तसेच जिल्ह्य़ात विविध ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी नियमितपणे जनता दरबार भरवीत असतात. मात्र कथोरेंचा प्रभाव मानल्या जाणाऱ्या अंबरनाथ परिसरात त्यांनी जनता दरबार भरविणे टाळले होते, पण गेल्या वर्षअखेरीस त्यांनी अंबरनाथमध्ये जनता दरबार भरवून तेथील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच आता येत्या सोमवारी १० फेब्रुवारी रोजी बदलापूरमध्ये पालकमंत्र्यांचा जनता दरबार भरविला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत मुंबई-ठाण्यातील सेनेचे एकमेव खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून आपली अस्वस्थता व्यक्त केली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघातून आनंद परांजपे निवडणूक लढविणार आहेत. या प्रतिष्ठेच्या लढतीत सरशी होण्यासाठी तसेच ठाणे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या २४ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठीही नाईक-कथोरे दिलजमाई उपयुक्त ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रवादीचे ठाण्यात समन्वयाचे वारे
आगामी लोकसभा तसेच त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पक्षातील गटबाजी कमी करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला असून त्यातूनच ठाणे जिल्ह्य़ातील गणेश नाईक आणि किसन कथोरे
First published on: 09-02-2014 at 12:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coordination point outs in thane ncp leaders