मुंबईच्या मरिन ड्राईव्ह भागात असणाऱ्या एक्सप्रेस टॉवर इमारतीच्या समोरील सुलभ शौचालयात शुक्रवारी रिव्हॉल्वर सापडल्याने एकच खळबळ उडाली. या भागात अनेक राजकीय पक्ष आणि शासकीय कार्यालये असल्याने सुरूवातीला पोलिसांनी तातडीने तपासकार्याला सुरूवात केली. मात्र, काही वेळानंतर ही रिव्हॉल्वर एका पोलिस निरीक्षकाचीच असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित पोलिस निरीक्षक शौचालयातून निघताना स्वत:चे रिव्हॉल्वर तिथेच विसरून गेला. त्यानंतर, येथील कर्मचाऱ्यांना बेवारस रिव्हॉल्वर दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, पोलीस तपासात ही रिव्हॉल्वर आपल्याच कर्मचाऱ्याची असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाकडे ती सोपवण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2014 रोजी प्रकाशित
मुंबईतील सुलभ शौचालयात रिव्हॉल्वर सापडले!
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह भागात असणाऱ्या एक्सप्रेस टॉवर इमारतीच्या समोरील सुलभ शौचालयात शुक्रवारी रिव्हॉल्वर सापडल्याने एकच खळबळ उडाली.

First published on: 28-11-2014 at 08:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cop forgets gun in public toilet