अभिनेत्री प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणात मरिन ड्राइव्ह पोलीस सोमवारी किंग्ज इलेव्हन संघाची कर्मचारी तारा हिचा जबाब नोंदविणार आहे. तसेच चौकशीसाठी नेस वाडियालाही समन्स पाठवून बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियाने आपला विनयभंग केल्याची तक्रार प्रीती झिंटाने केली होती. दुसऱ्यांदा दिलेल्या जबाबात या प्रकरणात अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची नावे प्रीतीने सांगितली होती. तारा ही त्यापैकीच एक आहे. एकूण तीन ठिकाणी वाडियाने प्रीतीला शिवीगाळ केली होती. त्यापैकी दोन ठिकाणी तारा हजर होती. त्यामुळे तिचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Story img Loader