मुंबई : राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राज्यातील पहिली ते १२वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालये सुरू करण्याबाबत सामंत यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत करोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने महाविद्यालय  सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय  सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.