पोलिसांकडे तक्रार; तांत्रिक घोळ की गैरप्रकार?
मुंबई : लस घेतलेली नसताना कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालये यासाठी कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक दोषांकडे बोट दाखवत आहेत. पोलिसांनी मात्र यासंदर्भात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत हा प्रकार कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक घोळामुळे झाला की यामध्ये गैरप्रकार असावा, या दिशेने तपास सुरू केला आहे.

नीलेश मेस्त्री (वय ३३) यांनी १४ जुलैच्या रात्री कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील चव्हाण रुग्णालयात कोव्हिशिल्ड लशीकरिता कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली. त्यांना १५ जुलैची सकाळी १० ते ११ दरम्यानची वेळ मिळाली. परंतु त्या दिवशी कार्यालयीन कामामुळे त्यांना लस घेता आली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा नोंदणीसाठी ‘कोविन’ सुरू केले. त्यावेळी संबंधित रुग्णालयातून त्यांनी लशीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दिसले. मेस्त्री यांनी मनसेचे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘आम्ही तक्रार नोंदवून घेतली आहे. आणखी एका खासगी रुणालयाबाबत अशीच एक तक्रार आली आहे. कोविनमधील तांत्रिक घोळामुळे हा प्रकार झाला असावा की गैरप्रकार आहे, याबाबत आम्ही तपास करत आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

रुग्णालयाने गैरप्रकारची शक्यता धुडकावून लावत कोविनमधील तांत्रिक दोषांवर बोट ठेवले. ‘कोविनवर नोंदणी झाल्यानंतर वापरकर्त्यांला  एक ओटीपी मिळतो. तो केवळ त्यांच्याकडे असतो.  संबंधित व्यक्तीचा ओटीपी किंवा आधार घेऊन कुणीतरी लस घेतली असावी किंवा हा कोविन अ‍ॅपमधील घोळ असावा,’ अशी चव्हाण रुग्णालयाचे डॉ. विशाल चव्हाण यांनी व्यक्त केली.  पैसे खर्च करून खासगी रुग्णालयात लस घ्यायचे ठरवले. आता हा घोळ मिटेपर्यंत मला लस घेता येणार नाही,’ अशी प्रतिक्रि या नीलेश मेस्त्री याने दिली. रुग्णालयाने आधार कार्ड न तपासताच लस कशी दिली, असा प्रशद्ब्रा त्यांनी केला.

सायबर गुन्हे शाखेकडून चौकशी रुग्णालयांकडे मेस्त्री यांचा ओटीपी कसा आला. तसेच, आधार कार्डशिवाय  प्रमाणपत्रावरील बारकोडही जुळतो आहे. या प्रकारातील गांभीर्य पाहता गरज भासल्यास हे प्रकरण सायबर गुन्हे शाखेकडे सोपविले जाईल, असे मनोहर शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader